भाईंदर : कोविड 19 कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्याकामी पुकारण्यात आलेला लॉकडाऊन संचारबंदीमुळे मिरा भाईंदर मधील मच्छिमार फार मेटाकुटीला आलेला असताना वारंवार मार्केट व खुला बाजार बंद केल्याने मच्छीमाराना पकडून आणलेली मासळी विक्री करणे पूर्णपणे बंद झाले आहे. ऑगस्ट मध्ये मासेमारी सुरू झाली त्या वेळी एका मागोमाग वादळाची शृंखला माहे ऑक्टोंबर पर्यंत सुरू होती. थंडी च्या सिझन मध्ये मासळी मिळेनासी झाली होळी नतंर गरमीच्या सिझन मध्ये मासळी मिळेल अशी आशा असताना कोरोना मुळे पुकारलेले लॉक डाऊन अश्या संकटाच्या साखळीने मच्छीमाराचे जगणे कठीण झाले आता मे महिण्याच्या 31 तारखेला मासेमारी बंद होणार. डिझेल, बर्फ, इत्यादी खर्च करून मासेमारी करून आणलेल्या मासळीची विक्री करता येत नाही कारण सर्व बाजार, मार्केट बंद कुठे बाहेर जाता येत नाही तर मासळी कुठे न्यावी हा प्रश्न आहे. त्या मुळे खलाशयांचे पगार कुठून द्यायचे. कर्ज काढायचा विचार केला पण बँका लॉकडाऊन मुळे कर्ज देत नाही ह्या अश्या दुष्ट चक्रामध्ये मच्छिमार सापडलेला, मच्छिमार प्रशासनाला वारंवार विनवण्या करीत होता. काही मार्ग काढा आम्ही आणलेली मासळी विकली तर आमच्या मजुरांचे पगार व आमचा पावसाळी काळात लागणारे धान्य खरेदी करू त्या अनुषंगाने दिनांक 10/05/2020 रोजी शिवसेना नगरसेविका श्रीमती. तारा घरत, स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सचिन घरत, शिवसेना नगरसेविका श्रीमती शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख बर्नड डिमेलो यांनी दुपारी 2 :00 वाजता पालिका आयुक्त मा. श्री. चंद्रकांत डांगे यांची भेट घेऊन मच्छीमारांच्या अडचणी व समस्या मांडल्या व आम्हाला दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करून जागा निश्चित करून ताजी मासळी व सुकी मासळी विक्री करिता परवानगी द्यावी व मच्छीमाराना दिलासा द्यावा अशी मागणी केली.
मच्छीमारांच्या मागणीवर आयुक्ताने यांनी 13/ 05/2020 रोजी पासून शहरातील लॉक डाऊन शिथिल करणार आहोत त्या मध्ये होलसेल मासळी विक्री करण्याकरिता पहाटे 4 :00 वाजले पासून सकाळी 9 : 00 वाजे पर्यंत सुभाषचंद्र बोस मैदान येथे जागा देण्याचे मान्य केले परंतु सोशल डिस्टनसिंग पाळणे ही जबाबदारी मच्छिमार कार्यकर्ते यांनी सांभाळावी ह्या अटीवर दिनांक 13 / 05 / 2020 पासून बाजार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सचिन घरत यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली.