मिरारोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओवळा-माजिवडा चे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर मध्ये मोफत औषध फवारणी सेवा सुरु केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात सर्वत्र औषध फवारणीची गरज असताना अद्याप काही ठिकाणी औषध फवारणी झालेली नाही अशा ठिकाणी मागणीनुसार त्या-त्या ठिकाणी मोफत औषध फवारणी केली जाणार आहे. त्यासाठी 25 जणांची औषध फवारणी टिम बनवण्यात आली असून ह्या टिमच्या माध्यमातून 10 मे ते 10 जुलै 2020 पर्यंत सेवा पुरविण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार सरनाईक यांनी दिली.
ज्या सोसायटी मध्ये किव्हा एखाद्या ठिकाणी औषध फवारणी झाली नसेल आणि जिथे औषध फवारणीची गरज आहे त्यांनी कार्यालयाशी दूरध्वनी 022-28115050 किव्हा वॉटसअप 9136549172 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.